मा. सुरेश पाटील महापौर पदावर असताना केलेले कार्य

देवदासी रक्षाबंधन – देवदासींच्या वस्तीत जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम
स्वच्छ व सुंदर महापालिका अभियान – इंदिरानगर झोपडपट्टीमधील साक्षरता कार्यक्रम, महापौर दौडीचे आयोजन, स्वतः हातात झाडू घेऊन जनजागृती अभियानाचा संदेश, कच-याचा उठाव.
गणपती विसर्जन – नदीला पाणी नसल्याने विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती उघड्यावर पडल्याने अशावेळी स्वतःघाटावर जाऊन अग्निशामक, आरोग्य, बांधकाम विभागाचे कर्मचारी व राजमती स्पोर्टसचे खेळाडू यांच्या मदतीने पाण्यात उभे राहून गणेशामूर्तींचे खोल पाण्यात विसर्जन केले.
मानवी साखळी – सांगलीवाडी ते मिरजेपर्यन्त 40 हजार विद्याथ्र्यांच्या व नागरिकांची प्रचंड मानवी साखळी तयार केली.
क्रीडाविषयक – सांगली जिल्ह्याचे नांव चमकविणा-या खेळाडूंना शिवछत्रपती अवोर्डस देवून महापालिका सेवेत सामावून घेणे. विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करणे.
आरोग्य विषयक – गटार स्वच्छता उपक्रमास सुरुवात, स्त्रीरोग आरोग्य तपासणी शिबीराचे व डास निर्मूलन मोहिमेअंतर्गत गप्पी मासे डबक्यात सोडणे, नागरिकांना केओथ्री औषधामध्ये मच्छरदाण्या मोफत बुडवून देणे इ. कामांची सुरुवात
अतिक्रमण पथकाच्या नियुक्तीचा निर्णय – बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वानुसार दुकानगाळे बाधणे आदी उपक्रम राबविले. झोपडपट्टी पुनर्वसन,वृक्षसंवर्गन,रस्ता रुंदीकरण इ.
घंटागाडी – मिरज व कुपवाडला प्रथमच घंटागाडीची सुरुवात
काळ्या खणीचा प्रष्न – काळ्या खणीचे पर्यटन स्थळात रुपांतर होण्यासाठी 10 कोटीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे सादर केला. त्यास तत्वतः मंजूरी
भुयारी गटारयोजना – रु.8 कोटी 80 लाख भुयारी गटार योजनेच्या कामास सुरुवात झाली.
शेरीनाल्याचा प्रष्न – पर्यावरण विभागाचे सचिवाबरोबर झालेल्या बैठकीत शेरीनाल्याचा प्रष्न मांडून योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यांत आला. हा प्रष्न आता संपूष्टात आला आहे.
शैक्षणिक सुधारणा – दर्जा सुधारण्यासाठी विशेष कार्य, तज्ञांच्या बैठकीचे आयोजन, गुणवत्ता वाढीसाठी नियोजन, मुलांसाठी बालआनंद मेळावे,
बालवाडी निर्मिती – शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढण्यासाठी 99 बालवाड्याची निर्मिती
सांस्कृतिक वारसा – संगीत व नटसम्राट कै. दीनानाथ मंगेशकर व बालगंधर्व यांचाविषयी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीकोनातून सांस्कृतीक कार्याक्रमाचे आयोजन केले.
श्री गणपती महोत्सव – तरुण भारत स्टेडीयमवर त्यांनी गणपती महोत्सवाचे आयोजन केले.
मिरज संगीत महोत्सव – मिरजेत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले.
मंगेशकर कुटुंबाचा सत्कार – यावेळी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे व मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाच्या कोनशीला समारंभाचे उद्घाटन करण्यांत आले.
समाज प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन
विकासाचा ध्यास – अनेक विकास कामे तडीस नेऊन पूर्ण केली.
स्व. वसंतदादा पाटील स्मारक – कृष्णातीरावरील स्माारक पूर्ण. जुन्या स्टेशन चैकातील महापालिकेची 32000 स्कवे. फूट जागा वसंतदादा स्मारक समितीला देऊन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या जागेचे भूमीपूजन झाले. सद्या पूर्णत्वास येत आहे.
प्रतापसिंह उद्यान – प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरणाच्या कामास सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांशी महापालिकेच्या अनेक प्रलंबित कामासाठी चर्चा
महापालिकेच्या प्रशासकीय विभागाचे संगणकीकरण
आठवडा बाजार – सांगली, मिरज आणि कुपवाड येथे आठवडे बाजार सुरु केले.
इतर निर्णय – काळी खण, बालगंधर्थ, रस्ता रुंदीकरण, माळ बंगल्यामधील जलशुद्धीकरण, प्लॅस्टिक पिशव्यांचे निर्मुलन, स्व. वि‛णूआण्णाा पाटील स्मारकाचा आराखडा पूर्ण करुन पहिल्या टप्प्याच्या 33 लाख रुपयाच्या कामास प्रारंभ केला. मिरज येथील शाळा, बेडक रोडवरील कत्तलखाना इमारत, मिरज कृष्णा घाट येथे स्मशानभूमी, दीनानाथ नाट्यगृहाचे नूतनीकरण कर्मवीर भाऊराव पाटील चोक ते विश्रामबाग रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, बापट मळ्यातील बालोद्यान, कुपवाड येथील जलकुंभ पंप हाऊसचे बांधकाम, स्व. वसंतदादा पाअील स्मारकाचे सुषोभीकरण इ. कामे प्रगतीपथावर आहेत.
पाणीपुरवठा – सुधारित पाणीपुरवठा योजना, पाण्याची टाकी बांधणे,
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न – जकात, पाणीपुरवठा, घरपट्टी आदी विविध विभागाच्या कारभारात कमालीच्या सुधारणा घडवून आणून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
धोरणात्मक निर्णय – शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करुन अंतिम मंजूरी व जमिन मिळविली.
व्यापारी संकुल – व्यापार संकुलाच्या ऐतिहासिक व विक्रमी लिलावातून महापालिकेस 1 कोटी 75 लाखाचे उत्पन्न मिळवून दिले.
मिरज येथील गणेश तलावाच्या सुशोभीकरण व आकर्षक कारंजे बसविण्याचे काम पूर्णत्वास
वहातूक व्यवस्था – रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पडीक जागेत 20 हजार टन कच-याव्दारे भराव घालून 2 एकराची प्रषस्त वाहनतळ उभे केले
विकास आराखडा – विकास आराखडा खाजगीकरणामधून करण्याचा धोरणात्मक निर्णय
कतलखाना -कत्तलखाने मिरज येथे बेडक रस्त्यावर 71 लाख खर्च करुन बांधण्याचा निर्णय
पर्यावरण संतुलन – प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा 3 हजार झाडांची ट्रीगार्डमध्ये लागवड
आशियाई महापौर परिषद निवड – आशियाई महापौर परिशदेसाठी त्यांची निवड करण्यांत आली. या महापौर परिशदेच्या वेळी त्यांनी विदेशामधील महापौरांशी संवाद साधून विकास योजना, महत्वाचे प्रकल्प याची माहिती घेवून सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेत विविध प्रकल्प राबविले.
महापालिकेतील खटल्यासाठी स्वतंत्र न्यायालय करण्याचा ठराव मंजूर
गुंठेवारी समस्या – गुंठेवारीमधील नागरिकांचे प्रष्न सोडविले आहेत.
नियाजित प्रस्तावित कामे – शेरीनाला योजना अंतिम टप्प्यात आहे. झोपडपट्टी पुर्नवसनासाठी बेघरांना घरकुल बांधून देणे, बापट मळ्यात 25 लाख खर्चून बालोद्यान विकसित करणे. काळी खणीचे सुषोभीकरण करुन भंगार बाजाराचे सांगली-कोल्हापूर रस्त्यावर पुनर्वसन करणे. इ. नियोजीत कामाचा समावेश