मा. सुरेश पाटील यांचे 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनमध्ये केलेले कार्य

स्वागताध्यक्ष – दि. 28, 29, 30 डिसेंबर 2007 अखेर लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली आयोेजित 21 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सांगली येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाध्यक्षा ख्यातनाम साहित्यिका मा. विजयाताई वाड, या बालकुमार साहित्यसंमेलनाचे उद्घाटक प्रसिध्द साहित्यिक आणि लोकप्रिय कथाकथनकार मा. द. मा. मिरासदार, यांच्या उपस्थितीत या भव्य दिव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. सदरचे साहित्य संमेलन लठ्ठे एजुकेशन सोसायटीच्या सांगली हायस्कूल, सांगली या ऐतहासिक शाळेच्या प्रांगनात संपन्न झाला. या तीन दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये भव्य ग्रंथ दिंडी, विविध विषयावरील परिसंवाद, मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, मराठी साहितिकांची प्रकट मुलाखत इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले.