मा. सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदगोंडा बाबगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राजमती नेमगोंडा पाटील वाचनालय, सांगली यांच्या वतीने आयोजित संविधान निर्माता संमेलनातील कार्य

स्वागताध्यक्ष :- दि. 15, 16 व 17 जानेवारी 2010 रोजी उपरोक्त संस्थेच्या वतीने सांगली येथील कल्पद्रुम क्रिडांगणावर संविधान निर्माता साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. यशवंत मनोहर (जेष्ट साहित्यीक) यांची एकमताने निवड झाली. भारतीय संविधानाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने संविधानाला तथा संविधान निर्मात्याला मानवंदना म्हणून देशात सर्वप्रथम या विषयावर संमेलन आयोजन करण्याचे कार्य मा. सुरेश पाटील यांनी कले. या तीन दिवसाच्या साहित्य संमेलनात, भारतीय संविधानाच्या प्रतिची भव्यदिव्य अशी मिरवणूक काढली, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवि संमेलन, पुस्त्क प्रदर्शन इ. कार्यक्म राबविण्यात आले.