Suresh Patil

मा.श्री.सुरेश पाटील
(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस)

Suresh Paitl

मा.श्री.सुरेश पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस
संस्थापक चेअरमन सांगली ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली

उद्योग, व्यापारी, शेती, त्याचबरोबर सामाजिक , आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्ये

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आर्थिक व क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण व यशस्वी अशा अर्धशतकी योगदान लक्षात घेवून भारताचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी  कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. ना. शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रराज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
वर्षभरात राज्यातील २३ जिल्हयांचा दौरा करुन ग्रामीण उद्योजक, महिला बचतगट, बारा बलुतेदार यांचे मेळावे घेवून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेल्या बलुतेदारांची चळवळ गतीमान व बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व बलुतेदार महासंघाची स्थापना करुन पदाधिका-यांचे संघटन मजबूत केले.
दिल्ली स्तरावर केद्रीय मंन्न्यांची भेट घेवून बारा बलुतेदारांच्या विविध समस्या निवारणासाठी निवेदने दिले व साहाय्याचे आष्वासन मिळवले.
ग्रामीण महाराष्ट्राच्या उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाला 3 महत्वाकांक्षी योजनांचे प्रस्ताव सादर केले. यामधून दरवर्षी सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती होवू शकते.
महाबळेष्वर येथे रु. २५ लाख खर्चाच्या ‘मध उत्पादन‘ केंद्राची स्थापना करुन मा. राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झाले.
गुजरात, पंजाब व चंदीगडच्या खादी ग्रामोद्योग महामंडळास भेटून माहिती घेतली.
रोजगार निर्मितीची प्रभावी अमंलबजावणी.

एकूण दोन राज्यात व चार जिल्हयामध्ये कार्यरत असणारी व 30000 विद्यार्थीसंख्या असणारी शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शिक्षण संस्था – आर्टस, सायन्स व कॉमर्स कॉलेजेस -3, लॉ कॉलेज – 1, नाईट कॉलेज-1, हायस्कूल व ज्यनि. कॉलेज-5, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज-1, गल्र्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज -1 पोलिटेक्निक कॉलेज -1, बी.एस. कोम्पोझीत प्रि. युनि. कॉलेज-1, इंग्लिष मिडीयम कॉन्व्हेट व प्रायमरी स्कूल-9 कृषी विद्यालय-1, आय.टी.आय.-1, कॉम्पुटर अॅकॅडमि1, लेडीज हास्टेल-3, श्रमिक महिला वसतिगृह-1, प्रक्टिसिंग स्कूल-1, अंतर्गत परिक्षा मंडळ-1, प्रिंटींग प्रेस-1
अषा एकूण 38 विविध शैक्षणिक शाखा असणारी लठ्ठे एजुकेशन  सोसायटी, सांगली

संस्थापक:- ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल, सांगली
सभागृह नेता(1998ते2008) :- सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिका
महापौर (1999 ते 2001) :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
माजी उपाध्यक्ष :- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, मुंबई
माजी अध्यक्ष :- सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली
संस्थापक चेअरमन :- दि. सांगली ट्रेडर्स को-ओप  क्रेडीट सोसायटी लि., सांगली
संस्थापक चेअरमन :- सांगली मर्चंटस को-ओप इस्टेट लि., सांगली
संचालक :- जमखंडी शुगर वर्क्स लि. जमखंडी
संचालक :- डायमंड कोल्ड स्टोअरेज प्रा. लि. कुपवाड
संचालक :- कृष्णा व्हॅली क्लब एम.आय.डी.सी., कुपवाड
संस्थापक :- ए. बी. पाटील कृषी  प्रबोधन मंच
संस्थापक :- अडत व्यापारी संघटना, मार्केट यार्ड, सांगली.
विश्वस्त:- श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र कमिटी
स्वागताध्यक्ष :- दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन
स्वागताध्यक्ष :- अखिल भारतीय जैन मराठी परिषद,
स्वागताध्यक्ष :- मिरज जैन मराठी परिषद
स्वागताध्यक्ष :- 21 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
निमंत्रक :- अल्पसंख्यांक अन्याय परिषद
सचिव :- कल्पद्रुम आराधना महोत्सव समिती
संयोजक :- विष्वषांती सद्भावना सम्मेद षिखरजी यात्रा 2009
स्वागताध्यक्ष :- संविधान निर्माता साहित्य संमेलन 2010
संयोजक :- कैलास मानसरोवर यात्रा 2011
स्वागताध्यक्ष :- अहिंसा रॅली व सर्व धर्मीय अहिंसा संमेलन 2012
अध्यक्ष :- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई

उद्योग व व्यापार चळवळीतील सहभाग

सन 1988:- संचालक, सांगली चेबर्स ऑफ कॉमर्स
सन 1989-91:- उपाध्यक्ष, सांगली चेबर्स ऑफ कॉमर्स
सन 1992-99:- अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सया अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत व्यापारी व उद्योजकांवर होणा-या अन्याय थांबविण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या या 85 वर्षाच्या महाराष्ट्रातील जून्या व्यापारी संघटनेच्या गेल्या 82 वर्षातील सर्वात तरुण वयाचा अध्यक्ष होण्याचा मान. सांगली जिल्हयातील व्यापारी वर्गाचे यषस्वी संघटन. या जिल्हा पातळीवरील संस्थेषी तालुका पातळीवरील व्यापारी संघटनासहीत एकूण 27 संघटना सलंग्न. राज्य व्यपारी परिषदेचे 3 वेळा यषस्वी संयोजन.
सन 1987:- जकात विरोधी आंदोलन निमित्त संपूर्ण जिल्हयातील संघटना एकत्रीत करुन् उपोषण, मोर्चा, सायकल मोर्चा काळया फीती लावून मूक मोर्चा व्दारे जनजागृती
सन 1990:- शासनाने गुळावर सेल्स टॅक्स बसविला त्या विरोधात सांगली जिल्हयातील गुळ व्यापार 21 दिवास बंद आदोंलन. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सांगली बाजारपेठेत गुळाची आवक होती. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र झाले. शासनाने विधानसभेत पास केलेला कायदा विधानसभेत मागे घेतला.
सन 1990:- सांगली शहरातील पूरामुळे दोन हजार लोकांचे जनजीवन विस्क्ळीत झाले होते. अशावेळी त्यांना तांदूळ व डाळ पूरविणे जेव्हा जीवनावष्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या तेव्हा चेंबर ऑफ कॉमर्सने रास्त भाव दुकानामार्फत या वस्तु पुरविल्या.
सन 1992:- राज्य व्यापारी परिषदेचे 3 वेळा यषस्वी संयोजन या प्रसंगी प्रमुख पाहूणे अर्थराज्यमंत्री अरुणभाई गुजराथी हे होते.
सन 1993:- कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील जाचक तरतुदी विरोधी आंदोलनाचे जिल्हयातील यषस्वी नेतृत्व. सातारा येथील परिषदेमध्ये राज्याचे सहकारमंत्री मा. अभयसिंहरोज भोसले यांचे उपस्थित हा प्रश्न जोरदार पणे मांडला व त्याचवेळी मा. सहकार मंत्र्यानी या जाचक तरतूदी रदद् केलयाची घोषणा केली.
25 नोव्हेंबर 1994:- राज्य व्यापारी व उद्योजक भव्या परिषद कृष्णा व्हूली व चेंबरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेस पाच हजार व्यापारी व उद्योजक उपस्थित. तत्कालीन मुख्यमंत्री मा. षरद पवार यांचे उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. मा. मुख्यमंत्र्यांनी शासनाचे व्यापार धोरण जाहीर केले.
सांगली जिल्हयात 4000 एकराची MIDC ची मागणी. मा. नामदार शरद पवारसाहेब यांनी MIDC उभारणीबाबत घोषना.
महाराष्ट्रातील निरनिराळया ठिकाणी वेळोवेळी होणा-या परिषदामध्ये व्यापा-यांचे प्रश्न तळमळीने मांडणारा प्रमुख वक्ता म्हणून सहभाग.
ऑगस्ट 1994:- सांगली शहरातील जकात ठेकेदारांची अन्यायकारक वसुली बंद पाडली. या प्रसंगी शहरातील व्यापा-यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन
सन 1994:- सांगली मार्कट यार्डात बेदाण्याचा उघड लिलाव पध्दतीने व्यापार सुरु केला. संपूर्ण भारतात सर्व प्रथम असा व्यापार सांगली येथे सुरु करणेचे कार्यज्ञत पुढाकार.व्यापा-यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी, व्यापारी वर्गात जागृती करण्यासाठी व्यापार विषयक नियतकालीकातून व वर्तमान पत्रातून सातत्याने लेखन. 1995 साली मार्केट अॅक्ट मध्ये शेतक-यांच्या पट्टीतील खर्चाबाबत शासनाने तो कायदा मागे घेतला. या कामी पूणे परिषद व सांगली शहर व्यापारात तीव्रता वाढवली.
मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री श्री गोपिनाथ मुंडे यांचे बरोबर व्यापारी समस्याबाबत शासनाने व्यापार विषयक धोरण जाहीर करणेबाबत चर्चा केली.
सन 1992:- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज या संस्थेवर सांगली व सातारा विभागात अध्यक्ष म्हणून निवड
सन 1994:- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड.
मार्केट यार्डातील अडत व्यापा-यांची संघटना केली. 1989 साली संघटना स्थापना केली. दैनदिन हिषोबाबाबत अडचणी सोडविणेस या संघटनेचा मोलाचा वाटा.
सांगली शहरात वखारभाग येथे प्रवासी वाहतूक करणा-या ट्रॅक्स गाडयासाठी पार्किगची सोय करण्यात पुढाकार घेवून योजना तयार करुन मंजूर करुन घेतली.
सांगली शहरात दत्त मारुती रोड वरील अतिक्रमाणामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी आंदोलन.
सन 1995:- रोटरी क्लब व व्यापारी मित्र यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान सत्र शिबीराचे आयोजन.
चेंबर भवन महावीरनगर येथे 5 लाख रु. खर्चाचा अत्याधुनिक सुविधा असलेला व अंदाजे 200 लोकांची व्यवस्था असू शकेल असा कोन्फेरंस हॉल.
बेदाण्यावरील जकात संपुर्ण माफ तसेच सोने चांदीवरील जकात कमी करणेबाबत यषस्वी प्रयत्न.
सन 1998:- राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन स्थळ – राजमती भवन, सांगली
सन 1998:- उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमेरसे अँड इंडस्ट्रीज, मुंबई
सन 1999:- सांगली जिल्हा इंटरनेट नोड कार्यान्वीत करणेत पुढाकार
मिरज पंढरपूर रोडवर 5000 एकरांची भव्य एम.आय.डी.सी. होणेसाठी गेले 5 वर्षे सातत्याने शासन दरबारी प्रयत्न. उद्योग मित्र परिषदेत उद्यसेगमंत्री लीळाधर डाके यांनी सांगली येथे ही एम.आय.डी.सी. करण्याचे जाहीर केली.
पुणे ते संकेष्वर पर्यंत पर्यायी महामार्गाची संकल्पना मांडली. पुणे, हडपसर, जेजूरी, फलटण, विटा, तासगांव, सांगली, मिरज, चिकोडी, संकेष्वर असा महामार्ग व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शासनाने आष्वासन दिले आहे.

सन 1989 :- सांगली जनता सहकारी बॅंकेत संचालक म्हणून बिनविरोध निवड तसेच 1994 सालीही संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली
सन 1994 :- वसंतदादा शेतकरी सह. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक म्हणून प्रचंड बहुमताने विजयी.
सन 1995 :- शहरातील व्यापा-यांसाठी घाऊक व्यापारी वसाहत करणेसाठी सांगली मर्चंटस् को. ओप इस्टेट लि. ची स्थापना केली या संस्थेने चिफ प्रमोटर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रात अशा प्रकारची सहकारी व्यापारी वसाहतीचा उपक्रम
सन 1992 :- सांगली को ओप  क्रेडीट सोसा लि. या संस्थेचे संस्थापक चेअरमन या संस्थेत सध्या 3 कोटी 10 लाख रु च्या ठेवी असून 850 वर सभासद आहेत. सलग 6 वर्षे  100%  कर्ज वसूनी असून संस्थेची स्वतःची 15 लाखाची भव्य वास्तु आहे. सतत वर्ग अ व 24% डिव्हीडंट ही संस्थेची वैशिष्टेआहेत. यंदाचा नफा 15 लाख रु इतका आहे.

 

 • शैक्षणिक कार्ये
  सन 1990 :- श्री. ए. बी. पाटील इंग्लीश स्कूलची नेमिनाथ नगर येथे स्थापना. सांगली शहरातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेची गनना केली जाते. सध्या 10 वी पर्यंतचे वर्ग असून 600 विदयार्थी येथे शिकत आहेत. इ. 2 री पासून विदयाथ्र्यांना कॉम्पुटरचे प्रशिक्षण दिले जाते व भारतीय संस्कृतीचे जतन केले जाते. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. तसेच कराटे, नृत्य, अथलेटीचे प्रशिक्षण ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. सतत 7 वर्षे 10 वीचा निकाल 100% लागतो
  महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रसिध्द असलेल्या लठ्ठे एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचा 1999 साली गव्हर्निंग व मेनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून नियुक्ती. या संस्थेत कला, विज्ञान, वाणिज्य अशा विविध प्रकारच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. जवळ जवळ 17000 विदयार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.
  सन 2001 पासून :- लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या चेअरमनपदी कार्यरत.
  सामाजिक कार्य
  सन 1986 :- श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टची स्थापना याव्दारे शहरातील अतिभव्य असे राजमती भवन हे मंगल कार्यालय बांधले.
  सन 1991 :- आदगोंडा बा. पाटील चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना
  संस्थापक :- राजमती सार्वजनिक वाचनालय यामध्ये 6000 ग्रंथसंपदा असून 650 चे वर सभासद आहेत. अ वर्ग ग्रंथालय म्हणून नावलौकीक
  संस्थापक – अध्यक्ष :- योग विदयाधाम सांगली, योगप्रसार प्रशिक्षण शिबीर, व्याख्याने यांचे आयोजन.
  संस्थापक :- राजनेमी कला महोत्सव याव्दारे संपूर्ण महाराष्ट्रत स्पर्धकांसाठी वकृत्व, एक पात्री अभिनय, रांगोळी, काव्यवाचन, एकांकिका स्पर्धांचे आयोजन, जवळजवळ 1000 स्पर्धकांचा सहभाग.
  संस्थापक :- वसंत मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ, मार्केट यार्डातील व्यापारी, हमाल, गुमास्ता, गाडीवान, मार्केटकमीटी या सर्व घटकांना एकत्रीत करुन हा गणेशोत्सव साजरा केला जातो. समाजातील सर्व घटकांच्या सामंजसाचा अलौकीक उदाहरण आहे.
  रोटरी क्लब ऑफ सांगली सन 1992-1993 करीता सेक्रेटरी त्यावेळी डीस्ट्रीक्ट 3170 ची पाच अवॉर्ड्स क्लबला मिळाले. सन 1995-96 अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सांगली.
  रोटरी क्लब ऑफ सांगली मार्फत शहरातील शाळा, कॉलेजच्या विदयाथ्र्यांसाठी मावा, गुटखा व्यसनमुक्तीसाठी जनजागरन मोहिम सृरु. जवळजवळ 7000 विदयाथ्र्यां पर्यंत हा कार्यक्रम पोहचवीला.
  पोलीओ प्लस, व्यापारी मित्र, ज्ञानसत्र शिबीर, सुर्यग्रहनाबद्दल अंधश्रदधा निमृलन, आरोग्य चिकीत्सा शिबीरे, इ. चे आयोजन व गुलाब प्रदर्षन यांचे कार्य या उपक्रमाव्दारे केले.
  सांगली जिल्हा इनकम टॅक्स को. – ओर्डीनेशन कमिटी.
  सांगली जिल्हा माथाडी बोर्ड.
  संस्थापक ए.बी.पाटील. कृषी प्रबोधन मंच, शेतक-यांसाठी विविध कार्यक्रम चर्चासत्रे आयोजन.
  संचालक कृष्णा व्हॅली क्लब.
  जैन समाज अल्पसंख्यांक दर्जा मंजूरी योगदान
  8 मार्च 2008 :- प.पू. श्री 108 तरुणसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत नेमिनाथनगर येथे सुमारे 40 हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक व अहिंसा परिशदेचे आयोजन
  2 ऑक्टोंबर 2012 :- प.पू. श्री. 108 अक्षयसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत सांगली हायस्कूलच्या प्रांगणात अल्पसंख्यांक व सर्व धर्मिय परिषदेचे आयोजन, सुमारे 40 हजार जनसमुदायाची उपस्थिती
  केंद्र व राज्य स्तरावरील प्रयत्न:- भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजितदादा पवार, मा. नामदार जयंतरावजी पाटील, मा. आर. आर. पाटील(आबा), तसेच मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व मा. पालकमंत्री यांना भेटून जैन समाजाला राज्यस्तरावर व केंद्र स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळाला पाहीजे यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
  धार्मिक कार्य
  सन 1983 :- नेमिनाथ नगर सांगली येथे जिन मंदीर, मानस्तंभ, त्यागी निवास बांधणेत पुढाकार
  सन 1989 :- महारष्ट्रात प्रथम कल्पदम आराधना महोत्सवाचे यषस्वी आयोजन, या समितीचा सेके्रटरी म्हणून कार्यरत. जैन मराठी साहित्यसंमेलनाचा प्रमूख संयोजक. जैन धर्मियांच्या प्रत्येक सत्र संमेलनात हीरीरीने पुढाकार.
  सन 1993 :- श्रवण बेळगोळ येथील महामस्तकाभिषेक प्रसंगी ओल इंडीया वर्किंग कमिटीवर निवड. या प्रसंगी महिनाभर तेथे राहून केलेल्या कार्याबद्दल उचीत गौरव.
  भारतीय जैन संघटना या महाराष्ट्र राज्य कार्यकारीनीवर निवड. वधु वर परिचय संमेलन भरविणेत पुढाकार. सांगली शहरात समस्त जैन समाजाच्या वतीने एकत्रीत महावीर जयंती मिरवणूक काढणेत पुढाकार.
  सन 1993 :- सन 1993 पासून नामदेव समाजाच्या वतीने होणा-या संत वांडःमय व्याख्यान मालेचा स्वागताध्यक्ष.
  भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय समितीवर निवड
  युवती सक्षमीकरण व युवक युवतींसाठी रोजगार मार्गदर्शन, व्यापार, उद्योग, व्यवसाय व्यवस्थापन मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण व पर्यावरण रक्षण, भूकंप, महापूर, दुष्काळ इ. प्रसंगी भरीव मदत करणा-या भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्र बांधणीच्या कार्यात सक्रीय सहभाग
  सन 1993 :- श्रवणबेळागोळ येथील महामस्तकाभिषेक समारोह महाराष्ट्र प्रदेष कलष वितरण समिती
  सन 2009 :- विश्वशांती सद्भावना सम्मेद शिखरजी यात्रा 2009 चे आयोजन करुन 1108 श्रावक, श्राविकांना दर्षन घडवून आणले यापैकी 400 श्रावक श्राविकांना मोफत दर्शन घडवून आणले
  क्रिडा
  युनिव्हरसिटी वेटलिफटींग चॅम्पियन 76 व 77 साली जी. ए. कॉलेज सांगली.
  राजमती स्पोर्टस् क्लबची स्थापना बॅडमिंटन, व्होलीबोलचि सुनिधा. क्रिडा प्रशिक्षण शिबीरे, सुप्त गुण विकास शिबीरे. तसेच या संस्थेने 4 राष्ट्रीय खेळाडू तयार केले. जवळ जवळ 150 खेळाडू कार्यरत आहेत.
  सांगली जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटीक्स असोषिएषन.
  वसंतदादा स्पोर्टस् क्लब, मार्केट यार्ड.
  राजकीय क्षेत्रातील कार्य
  माजी सरचिटणीस सांगली शहर युवक कॉंग्रेस आय.
  माजी जिल्हा संयोजक, व्यापार उदयोग रोल.
  सन 1991 पासून सांगली नगरपरिषद सदस्य
  सांगली प्रभावी वक्ता, कार्यक्षम नगरसेवक
  नागरिकांचा समस्यांबद्दल जागृत नगरसेवक म्हणून गनना.
  1997 उपाध्यक्ष, शहर कॉंग्रेस
  सन 1998 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 40 मधून विजयी.
  सन 1998 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सत्ताधारी पक्ष नेता म्हणून निवड
  सन 1998 ते 2008 पर्यंत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून कार्यरत
 • संचालक :- सन 1988 मध्ये प्रथमतः संचालक म्हणून काम करण्यांस सुरुवात केली.
 • उपाध्यक्ष :- सन 1989 ते 1991 मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
 • अध्यक्ष :- सांगली चेंबर ऑफ काॅमर्स या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत व्यापारी व उद्योजकांवर होणा-या अन्याय थांबविण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या या 85 वर्षाच्या महाराष्ट्री जून्या व्यापारी संघटनेच्या गेल्या 82 वर्षातील सर्वात तरुण वयाचा अध्यक्ष होण्याचा मान. सांगली जिल्हयातील व्यापारी वर्गाचे यषस्वी संघटन. या जिल्हा पातळीवरील संस्थेषी तालुका पातळीवरील व्यापारी संघटनासहीत एकूण 27 संघटना सलंग्न. राज्य व्यापारी परिषदेचे 3 वेळा यषस्वी संयोजन केले.
 • अध्यक्ष :- महाराष्ट्राचेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेवर सांगली व सातारा विभागात सन 1992 मध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली.
 • सदस्य :- महाराष्ट्राचेंबर ऑफ काॅमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलवर सन 1994 साली सदस्य म्हणून निवड झाली.
 • उपाघ्यक्ष :- माराष्ट्रचेंबर ऑफ  काॅमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबई च्या उपाध्यक्षपदी सन 1998 साली निवड झाली.

स्वागताध्यक्ष – दि. 28, 29, 30 डिसेंबर 2007 अखेर लठ्ठे एज्युकेषन सोसायटी, सांगली आयोेजित 21 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सांगली येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाध्यक्षा ख्यातनाम साहित्यिका मा. विजयाताई वाड, या बालकुमार साहित्यसंमेलनाचे उद्घाटक प्रसिध्द साहित्यिक आणि लोकप्रिय कथाकथनकार मा. द. मा. मिरासदार, यांच्या उपस्थितीत या भव्य दिव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. सदरचे साहित्य संमेलन लठ्ठे एजुकेषन सोसायटीच्या सांगली हायस्कूल, सांगली या ऐतहासिक षाळेच्या प्रांगनात संपन्न झाला. या तीन दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये भव्य ग्रंथ दिंडी, विविध विषयावरील परिसंवाद, गुणदर्षन, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्षन, रांगोळी प्रदर्षन, पुस्तक प्रदर्षन, मराठी साहितिकांची प्रकट मुलाखत इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले.

 

स्वागताध्यक्ष :- दि. 15, 16 व 17 जानेवारी 2010 रोजी उपरोक्त संस्थेच्या वतीने सांगली येथील कल्पद्रुम क्रिडांगणावर संविधान निर्माता साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. यषवंत मनोहर (जे‛ठ साहित्यीक) यांची एकमताने निवड झाली. भारतीय संविधानाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने संविधानाला तथा संविधान निर्मात्याला मानवंदना म्हणून देशात सर्वप्रथम या विषयावर संमेलन आयोजन करण्याचे कार्य मा. सुरेष पाटील यांनी कले. या तीन दिवसाच्या साहित्य संमेलनात, भारतीय संविधानाच्या प्रतिची भव्यदिव्य अशी मिरवणूक काढली, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवि संमेलन, पुस्त्क प्रदर्षन इ. कार्यक्म राबविण्यात आले.